एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
अहमदनगर, दि. 18 - दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक, सामुदायीक विवाह, आरोग्य शिबिराबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे हे 13 वे वर्षे असून दर वर्षी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. तसेच विविध कार्यक्रमांनी या उत्सवाची शोभा वाढते. या जयंती उत्सवाच्या भंडार्याला हजारो लोक दर्शनासाठी गर्दी करुन महाप्रसादाचा लाभ घेतात. एकदंत गणेश मंदिर व मंडळाचे सर्व सदस्य यासाठी विशेष परिश्रम घेतात.
एकदंत गणेश जन्मोत्सव 31 जानेवारी 2017 रोजी आहे. गुरुवार दि.26 जानेवारी रोजी दिप प्रज्वलनाने गणेश जयंती उत्सवास स.9 वा. प्रारंभ होईल., सकाळी 10 ते दु.5 पर्यंत रक्तदान शिबीर (अष्टविनायक ब्लड बॅक), शुक्रवार दि.27 रोजी स.10 ते 2 या वेळेत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, व 10.30 वा. मधुमेह तपासणी शिबीर व तसेच आरोग्य तपासणी करुन मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहे. शनिवार दि.28 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता हनुमान चालिसा (दक्षिणमुखी हनुमान सत्संग, सर्जेपुरा व मंगल भक्त सेवा मंडळ,एम.आय.डी.सी.), रविवार दि. 29 जानेवारी रोजी सायं.7 वाजता मनोरंजन कार्यक्रम (डान्स स्पर्धा), सोमवार दि. 30 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम (बत्कम्मा) होईल. श्री गणेश जयंतीदिनी मंगळवार दि.31 जानेवारी रोजी स.7 ते 9 श्री विघ्नेश्वर पूजन व श्री गणपती अथर्व शिर्षन नाममुर्ती अभिषेक, स.9 ते 10.30 होम हवन, स.9 ते दु.12 ‘श्री’च्या मुर्ती मिरवणुक व पुर्णाहुती, स.10 ते दु.1 श्री सत्यनाराण महापूजा, दु.1.वा.21 मि. सामुदायिक विवाह मुहूर्त, दु.1.30 ते 3 महाप्रसाद (भंडारा), दु.4 ते सायं.7 यावेळेत लहान बालकांसाठी गंमत जंमत व बाल मेळावा, असे कार्यक्रम होतील.याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकदंत गणेश मंडाळच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.