वीरपत्नींचा समाजाकडून सन्मान झाला पाहिजे : बेबीताई गायकवाड
अहमदनगर, दि. 18 - वीरपत्नी आणि विधवा महिलांसाठी दरवर्षी वेगळ्या उपक्रमांऐवजी घरातूनच त्यांचा सन्मान मिळावा. या महिलांचे पती देश संरक्षणासाठी आहोरात्र झडतात. देशासाठी वीर मरण पत्करतात. पण, समाज म्हणून आपण त्यांना व त्यांच्या वीरपत्नींना काय देतो याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. शाहू, फुले व आंबेडकर यांचे महिलांविषयीचे विचार आजच्या अत्याधुनिक ि्त्ररयांना प्रेरणादायक असेच आहेत. पण त्यांचे विचार समजण्यासाठी त्यांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तथा स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या बेबीताई गायकवाड यांनी व्यक्त केले. सांगली येथे मराठा समाज सांस्कृतिक भवनमध्ये वरीपत्नी व विधवा सौभाग्य सन्मान सोहळा झाला.
