Breaking News

लासलगांव बाजार समितीत लाल कांद्याच्या हंगामातील विक्रमी लिलावाची नोंद

लासलगांव, दि. 14 - लासलगांव बाजार समितीत   लाल कांद्याच्या हंगामातील 36410 क्विंटलचा विक्रमी लिलावाची नोंद झाली आहे. आज  दिवसभरात 1558 वाहनमधील 36410 क्विंटल कांद्याचा विक्रमी लिलावाची नोंद झाली आहे.कांद्याची किमान 171 कमाल 726 तर सरासरी 585 रूपये क्विंटल  दराने विक्री झाली.
या हंगामातील तीसर्‍यांदा विक्रम लीलाव ची नोंद लासलगांव बाजार समीतीत झाली तसेच डिसेंबर महिन्यात शुक्रवारी (दि. 30) कांद्याची 1404 वाहनातून 32  हजार 990 क्विंटल अशी हंगामातील विक्रमी आवक झाली होती. शुक्रवारी (दि. 6) रोजी कांद्याची 1447वाहनातून 33 हजार 920क्विंटल अशी हंगामातील विक्रमी  आवक झाली होती तसेच आज शुक्रवारी बाजार समितीत   लाल कांद्याच्या हंगामातील 36410 क्विंटलचा विक्रमी लिलावाची नोंद झाली आहे. दिवसंदिवस  कांद्याची आवाक वाढत असल्याने भावत घसरण होत आहे.सध्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने व्यापारी खरेदी देखील मोठ्या प्रमाणात  सुरु आहे.कांद्याला देशावर बाजारपेठेतुन मोठी मागणी असून देशावर बाजारपेठेत कांदा पाठ विन्यासाठी येथील रेल्वे स्थानकवरुण व्यपर्यांच्या मागणी नुसार वेगण  पुरवठा उपलब्ध होत नसल्याने व्यापारी वर्गात कड़े वाहतूक अभवि पॅकिंग केलेला कांदा पडून राहत आहे.
चालू वर्षी चांगला पाऊस व पोषक हवामान यामुळे लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असुन सध्या लासलगांवसह जिल्ह्यातील सर्व बाजार  समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची आवक होत आहे. मात्र सदर कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्याने सदरचा कांदा खरेदी केल्यानंतर त्याची ग्रेडींग  व पॅकींग करून त्याचा लवकरात लवकर निकास करावा लागतो. लासलगांव येथुन रेल्वेद्वारे कांदा पाठविण्याची सुविधा असल्याने येथील खरेदीदार प्रामुख्याने  रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणावर परराज्यात कांदा पाठवितात. मात्र सध्या बाजार समित्यांमध्ये विक्रीस आलेल्या कांदा आवकेचा विचार करता येथील खरेदीदारांनी खरेदी  केलेला सर्व कांदा ट्रकद्वारे परराज्यात पाठविणे अशक्य असल्याने व ट्रकद्वारे कांदा पाठविल्यानंतर मालाची खराबी आणि ट्रान्सपोर्टचा जादा खर्च यामुळे येथील  खरेदीदार त्यांचा कांदा पाठविणेसाठी रेल्वेला जास्त पसंती देतात.