Breaking News

चार लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला

नांदेड, दि. 14 - ट्रकमधून अवैधरीत्या जाणारा चार लाख रुपये किमतीचा गुटखा पकडून नष्ट करण्यात आला आहे. काल गुरूवारी स्थानिक गुन्हे  अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली .
 वजिराबाद पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाचा तपास करण्यासाठी गुरूवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीतील  भोकरफाटा परिसरात आले होते. दरम्यान त्यांना चोरट्या मार्गाने अवैध गुटख्याची वाहतुक ट्रक क्रं. ए. पी. - 29 टी. सी. 0498 मधुन होत असल्याची माहिती  त्यांना मिळाली. यावर पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून त्यास अर्धापूर - मालेगाव रोडवर पकडले. त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ गुटखा (  गोवा 1000 ) चे 40 पोते ज्याची किंमत 4 लक्ष 20 हजार रुपये असून वाहनासह मुद्देमाल अर्धापूर पोलीस ठाण्यात जमा करून स्थागुशा. चे सहायक पोलीस  निरीक्षक विनोद डिघोळे यांनी फिर्याद नोंदविली.
अन्न सुरक्षा निरीक्षक सचिन केदारे, संतोष कनकावाड नमुना सहाय्यक अमरसिंह राठोड यांनी सदर मुद्देमालाची तपासणी केली. हा मुद्देमाल रस्त्यावरच जाळून नष्ट  करण्यात आला.पोलीस अधीआक्षक संजय येनपुरे,पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद दिघोरे,, दशरथ  जांभळीकर, सदाशिव आव्हाड, तानाजी येळगे, तानाजी मुळके, राजु पांगरीकर, सुधाकर कदम यांनी तातडीने हालचाली केल्याने गुटखा पकडण्यात यश आले. या  प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 कलम 30 (2) ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अन्न सुरक्षा निरीक्षक सचिन केदारे हे  करित आहेत.