नोटाबंदीमुळे कर्जाची रक्कम न मिळाल्याने शेतकर्याची आत्महत्या
सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : पतसंस्थेने मंजूर केलेल्या कर्जप्रकरणाची रक्कम उपलब्ध न झाल्याने हतबल झालेल्या माण तालुक्यातील शिंदी खुर्द येथील तरुण शेतकरी संजय विनायक भोसले (वय 28) याने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. भोसले यांना नोटाबंदीच्या निर्णयामुळे कर्जाची रक्कम मिळू शकली नाही. त्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
संजय भोसले हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व कष्टाळू शेतकरी होते. साधारण दोन ते तीन एकरांत त्यांनी काद्यांची लागण केली आहे. लागण केल्याच्या सुमारास नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्याच वेळी त्यांनी पतसंस्थेकडे कर्जप्रकरण केले होते. त्यानंतर भोसले यांनी कांद्याची भांगलण केली, पण कांद्याची रोपे, लावणी व भांगलणाची मजुरी देण्यासाठी त्यांच्याकडे रोख रक्कम उपलब्ध नव्हती. त्यामुळे हे सर्व व्यवहार उधारीवरच चालले होते. भोसले यांचे कर्जप्रकरण मंजूर झालेले असतानाही रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे पतसंस्थेने पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे भोसले हे मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले होते. मलवडी बस स्थानकावर मित्रांसमवेत याच बाबींची चर्चा ते करत होते. मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर ते शिंदी खुर्द येथील आपल्या घरी गेले. त्यानंतर कोणाला काही कळू न देता त्यांनी विषारी तणनाशक प्राशन केले. काही वेळातच त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. ग्रामस्थांच्या हे लक्षात येताच त्यांना तत्काळ प्रथम दहिवडी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर वडूज येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला. भोसले यांच्या मागे अपंग वडील, आई, विवाहित भाऊ-बहिण असा परिवार आहे.