कॅशलेस व्यवहार; जिल्हा बँकेच्या खातेधारकांना बक्षिसाचा लाभ
सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने जास्तीत जास्त ग्राहकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी लकी ग्राहक योजना सुरु केली आहे. या योजनेत जिल्हा बँकेच्या विविध खातेधारक, कर्मचार्यांना कॅशलेस व्यवहार केल्याबद्दल बक्षीस मिळाले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी पत्रकाद्वारे दिली.
केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहार प्रोत्साहन योजनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य मिळावे यासाठी विविध पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. देशातील कोणत्याही पॉस (पीओएस) मशिनद्वारे व ई-कॉमर्सचे केलेले व्यवहारांमधून केंद्र सरकारकडून लकी ग्राहकांची निवड केली जात आहे. दि. 25 रोजी केलेल्या सोडतीत जिल्हा बँकेचे ठााहक अशोक मारुती शेडगे (शाखा पळशी, ता. खंडाळा) व सागर बबन भिसे (विस्तारित कक्ष अहिरे, शाखा खंडाळा) यांची कॅशलेस व्यवहारासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लकी ग्राहक योजनेत निवड झाली. या ग्राहकांच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित शाखेतील बचत ठेव खात्यावर बक्षिसांची रक्कम जमा झाली आहे.
त्याचप्रमाणे दि. 26 व 27 रोजी काढण्यात आलेल्या सोडतीत ज्ञानेश्वर दत्तात्रय ननावरे, सुजाता कृष्णा रासकर, रंजना योगेश अंबवडे, शंकर महादेव देसाई, दाजी बलराम पवार, प्रवेश श्रीकांत कानवडे व कृष्णात तात्याबा जठार या ग्राहकांना बक्षिसे जाहीर झाली आहेत.
बँकेने ग्राहकांना जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्डस, एटीएम मशिन, मायक्रो एटीएमची सुविधा प्राप्त करुन दिलेली आहे. त्याचा वापर करुन ठााहकांनी एटीएम व्यवहार, मर्चंट पॉस व्यवहार, ई-कॉमर्स आदी विविध कॅशलेस सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. सरकाळे यांनी केले आहे.