Breaking News

राजमाता जिजाऊ जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी ः कराळे

अहमदनगर, दि. 13 - राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. मात्र देशभरात शहाजीराजे व  जिजाऊ माँ साहेब यांची जयती उत्सव शासकीय स्तरावर साजार करण्यात यावा अशी अपेक्षा सुभाष कराळे यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आज जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कराळे बालत होते, यावेळी डॉ. निरज  साळुंखे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तसेच अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतंस्थेचे  व्यवस्थापक अशोक वारकड यांनी जिजाऊ वंदना सादर केली. केंद्रीय कार्यकारीण सदस्य  सोपानराव मुळे, तुकाराम मचे, अतुल लहारे, गोरख दळवी, सागर  कराळे, विजयपाटील, शरद निक्रड,  अशोक वारकड, ज्ञानेश्‍वर गांगर्डे,महेश काकडे, दत्ता साठे, आदिसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे  बोलताना  कराळे म्हणाले की, स्वराज्याची मुहर्त मेढ  शहाजीराजांनी  रोवली असली तरी ते अस्तित्वात आणण्यासाठी तसेच वास्तव्यात उतरवण्यासाठी  जिजाऊंनी शिवरायांवर जे संस्कार केले ते वाखणण्याजोगे आहे. जिजाऊंनी शिवरायांना सर्व शिक्षण देऊन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जो शिवमंत्र दिला तो  त्यांनी सार्थ करुन स्वराज्य निर्माण केले.
देशात दोन राजांच्या माता आणि पिता होण्याचा मान शहराजीराजे व राजमाता जिजाऊ यांना मिळाला आहे. या थोर महापुरुषांची  जयंती   ही शासकीय क  ार्यालयातही  साजरी व्हावी अशी  अपेक्षा सुभाष कराळे यांनी व्यक्त केली आहे.
मराठा सेवा संघाच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात आज राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती साजरी करण्यात आली यावेळी बोलताना सुभाष कराळे यांनी  सांगीतले की, राजमाता जिजाऊ जयंती ही शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी यातुन बहुजन समाजाला एक नवी दिशा व प्रेरणा मिळेल. तसेच लवकरात  लवकर शिवस्मारकाचा प्रश्‍न मार्गी लागवा यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.