Breaking News

अमेरिकेतील पाहुण्यांनी केले हिवरे बाजार व जखणगांवचे कौतुक

अहमदनगर, दि. 13 - जगातील विख्यात फायनान्स व म्युचुअल फंड कंपनी वेलिंग्टन मॅनेजमेंटचे संचालक एरिक राईस व टॉम हे सध्या भारत दौर्‍यावर असून, ते  भारतातील विकसित गोष्टींवर लक्ष केंद्रीत करुन विविध विकास कामांना भेटी देत आहेत. हिवरे बाजार गावाला भेट देऊन त्यांनी पाणी व्यवस्थापन, पाणी  आडवा, पाणी जिरवा तसेच स्वच्छता याबाबतीत गावाची स्त्युती करुन सरपंच पोपटराव पवार यांच्या कार्यावर प्रभावित होऊन त्यांचे कौतुक केले. गावाचा  विकास बघून याची नक्कीच अंमलबजावणी जगात करण्याची ग्वाही त्यांनी येथे दिली.
त्याचप्रमाणे त्यांनी जखणगांव येथील गंधे हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. त्यांनी येथे राबवित असलेल्या आरोग्यग्राम  संकल्पनेचे कौतुक केले. डॉ.सुनिल गंधे  यांनी पाच पायली धान्यात 1 वर्षभर मोफत उपचार देऊन औषधे व निदान मोफत होत असल्याची माहिती दिली. हा प्रकल्प स्त्युत्य असून प्रत्येक गावात व संपूर्ण  जगात याची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी अपेक्षा यावेळी एरिक राईस यांनी व्यक्त केली. डॉ.सुनिल गंधे यांनी आजवर घेतलेल्या सर्वरोग निदान शिबीरे व  योग शिबीरांची दखल घेत त्यांचे सामाजिक कार्य वाखणण्याजोगे आहे, असे सांगून डॉक्टरांचे कौतुक केले.
यावेळी बारक्लेज अमेरिका यांचे भारतीय व्यवस्थापक सौरभ सिंग यांच्यासह सीए अजय गांधी, अशोक गांधी, सहदेव वाबळे, डॉ.राजेंद्र गंधे, डॉ.सुयश गंधे,  बाळासाहेब कार्ले, भागुजी कार्ले, सुरेश कार्ले, दिपा पवार, मुजिब शेख, विनायक आडसूळ आदि उपस्थित होते.