Breaking News

जिल्हास्तरीय सुर्य नमस्कार स्पर्धेत मार्कंडेय शाळेतील मुलींचा संघ तृतीय

अहमदनगर, दि. 13 - मेजर दिनुभाऊ कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय सुर्य नमस्कार स्पर्धेत गांधी मैदान येथील श्री  मार्कंडेय विद्यालयातील मुलींच्या संघाने इ.5 वी ते 8 वीच्या गटात तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल संघातील खेळाडूंचा पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  शरद क्यादर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष रमेश सब्बन, मुख्यध्यापक रावसाहेब क्षेत्रे, उपमुख्यध्यापक पांडुरंग गोने, अरविंद चन्ना,  पर्यवेक्षक दिपक रामदीन, सरोजनी रच्चा उपस्थित होते.
शरद क्यादर म्हणाले की, व्यायाम हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. सुर्य नमस्काराने शरीर सदृढ होवून मन एकाग्र होते. सोशल  मिडीयात गुंतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास आवाहन केले.म.ए.सो. चे रेणावीकर विद्यालय, योग विद्याधाम व क्रीडा भारती यांच्या संयुक्त  विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील 60 शाळेच्या संघांनी सहभाग नोंदवला. तृतीय क्रमांक पटकाविणार्‍या श्री मार्कंडेय शाळेच्या  मुलींच्या संघात संजना भिमनाथ, त्रिशाली तोटा, रुपाली गायकवाड, गौरी गवाड, साक्षी दुव्वा, कशीष पाडे, रेणुका पळसकर, सैंदर्या सुरम,  गायत्री बत्तीन या  विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्यांना क्रीडा शिक्षक सौ.रेखा बुराव व दीपक रामदिन यांचे मार्गदर्शन लाभले.