Breaking News

माधवनगर मध्ये महावितरणच्या उप केंद्रातून ताब्यांच्या पाईपची चोरी

सांगली, दि. 15 - माधवनगर (ता. मिरज) येथील महावितरणच्या उपकेंद्रातून सहा हजार रुपयांच्या ताब्यांच्या तीन पाईप चोरट्यांनी लंपास केल्या. मंगळवारी ही  घटना उघडीस आली. याबाबत मारुती राजाराम चव्हाण (वय 44 रा. बामनोळी रोड, कुपवाड) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात  फिर्याद दिली आहे. 
महावितरणचे माधवनगर मध्ये उप केंद्र आहे. बुधवार 4 जानेवारीच्या मध्यानानंतर ते मंगळवार 10 जानेवारीच्या सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या कालावणीत  चोरट्यांनी उप केंद्रातील तीन ताब्यांच्या पाईप लंपास केल्या. प्रत्येकी तीन फुटांच्या या पाईप होत्या, याची किमंत सहा हजार रुपये इतकी आहे. याबाबत  संजयनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस फौजदार राजमाने हे पुढील तपास करीत आहेत.