अपेक्षांचे ओझे मुलांवर लादु नका ः किशोर पवार
कराड, दि. 3 (प्रतिनिधी) : पालकांनी अपेक्षांचे ओझे मुलांवर लादु नये. मुलांच्याही आवडी निवडीकडे लक्ष दिलेच गेले पाहिजे. केवळ वार्षिक परिक्षेतील गुणांकडे लक्ष न देता त्यांच्या बौध्दीक विकासाबरोरच शारीरीक विकासावरही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. यातुनच मुलांना मायेच्या ओलाव्यारुपी सुरक्षिततेचे कवच पालकांनी पुरवावे, असे भावनिक आवाहन कराडचे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी केले.
ओगलेवाडीजवळ कराड जनता चॅरिटेबल ट्रष्ट संचलित एंजल्स इंटरनॅशनल स्कूल, विरवडे-कराडच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. स्कूलतर्फे झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वी वाचवा या संदेशावर आधारित उपक्रम स्तुत्य असून ऋतूगंध या संकल्पनेवर आधारित सादर केलेला कार्यक्रम हा केवळ मनोरंजन व कला प्रदर्शन एवढ्यापुरता मर्यादित न राहता एक सुंदर सामाजिक संदेश देणारा ठरल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा कराड जनता बँकेचे चेअरमन राजेश पाटील-वाठारकर होते. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या स्नुषा तथा सनबिम ग्रुपच्या संचालिका सौ. रचनादेवी सारंग पाटील, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. ऋतूजा राजेश पाटील, पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक सुजित पाटील, प्रा. एस. के. पाटील, बबनराव शिंदे, शामसुंदर तवटटे, शरद चव्हाण, समीर पाटील-वाठारकर, गोटेचे उपसरपंच अमित पाटील, महंमद आवटे, बाबुराव पवार, संस्थेचे विश्वस्त आनंदराव शिंदे, स्वप्निल शहा, अकबर शेख, स्कूलचे प्रिंसिपल प्रा. श्रीकांत चव्हाण यांच्यासह संस्थेचे संचालक, शिक्षक-शिक्षकेतर सेवक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. रचनादेवी सारंग पाटील यांनी विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी स्कूलतर्फे वर्षभर घेतल्या जाणार्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
राजेश पाटील म्हणाले, ओगलेवाडीजवळ स्वमालकीच्या प्रशस्त जागेत सर्व अत्याधुनिक सुविधा, साधन सामुग्री आणि अनुभवी-तज्ज्ञ शिक्षकवर्ग यामुळे एंजल्स इंटरनॅशनल स्कूलने अल्पावधीत नावलौकीक प्राप्त करुन आपली गुणवत्ता सिध्द केली आहे.
संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. ऋतूजा राजेश पाटील यांनी स्वागत केले. प्रिंसिपल प्रा. श्रीकांत चव्हाण यांनी शाळेचा आहवाल सादर केला. विद्यार्थीनीनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे पाहुणे आणि पालकांनी कौतुक केले. पाहुण्यांचे हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कु.. पुजा काळे, कु.. ऋतुजा पवार व संतोष शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. तर सौ. मनिषा भोसले यांनी आभार मानले.