Breaking News

‘बीएसएफ’,‘सीआरपीएफ’नंतर लष्कराच्या जवानाची ध्वनीचित्रफित प्रसारित

नवी दिल्ली, दि. 13 - सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादूर यादव आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान जीत सिंग यांच्यानंतर आता लष्कराच्या एका जवानाने ध्वनीचित्रफित प्रसारित केली आहे.
देहराडूनमधील जवान यज्ञ प्रताप सिंग यांनी वरिष्ठ अधिक-यांकडून वाईट वागणूक मिळत असल्याची व्यथा ध्वनीचित्रफितीच्या माध्यामातून मांडली आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिका-यांकडून होत असलेल्या शोषणाची माहिती 15 जून रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे दिली होती. लष्कराच्या अधिक-यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबद्दल यज्ञ प्रताप सिंगची खरडपट्टी काढली.
लष्करात अनेक ठिकाणी सैनिकांना कपडे धुणे, बूट पॉलिश करणे, कुत्र्यांना फिरवून आणणे, अशा प्रकारची कामे करण्यास सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी लक्ष घालून जवानांना न्याय द्यावा, अशी मागणी यज्ञ प्रताप सिंग यांनी केली आहे.