Breaking News

माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन

पुणे, दि. 13 -  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षाचे होते. बोपोडी येथील स्मशानभूमीत दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. छाजेड यांनी पुण्याचे महापौरपदही भूषवले होते. छाजेड हे पाच वेळा महापालिकेवर निवडून आले होते. राजकीय क्षेत्रात छाजेड हे मामू या नावाने ओळखले जात होते.  ते 1999 सालच्या विधानसभा निवडणुकीत बोपोडी मतदारसंघातून विजयी झाले होते.