Breaking News

मॉ जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त रॅली


बुलडाणा, दि. 13 - राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज 12 जानेवारी रोजी सर्वपक्षीय व संघटनाच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात  आले होते. स्थानिक राजमाता चौक येथे माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करुन या रॅलीला सुरुवात करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शहरात जिजाऊ जयंतीनिमित्त मानवंदना म्हणुन मोटारसायकल रॅली काढण्यात आली. माँ जिजाऊ यांच्या वेशभ्ाुषेतील महिला  अश्‍वावर आरुढ होवुन जिजाऊंच्या प्रतिमेसह सजविलेली खुली जीप व मोटारसायकल स्वारांचा ताफा तसेच भगवे फेटे परिधान केलेले 100 पेक्षा अधिक  महाविद्यालयीन विद्यार्थिंनी या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. तर रॅली दरम्यान जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय अशा  घोषणा देवुन शहर दणानुन सोडला होता.
सदर रॅली रिंग रोड मार्गे आयटीआय कॉलेज मलकापूर रोड मार्ग, जयस्तंभ चौक, बाजार लाईन, कारंजा चौक, एडेड चौक, चिखली रोड मार्गे सर्क्युलर  रोड, धाड नाका, संगम चौक काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप जयस्तभ चौक येथे करण्यात आला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, योगेंद्र गोडे,  संजय गायकवाड यांच्यासह सहकार विद्या मंदिरच्या अध्यक्षा कोमलताई झंवर, शिवसंग्रामच्या वंदनाताई निकम यांच्याहस्ते माँ जिजाऊंचे पुजन करण्यात आले,  तसेच जिजाऊ वंदना घेण्यात आली.