Breaking News

मेरा बु. जि.प.सर्कलसाठी अनेकांना लागले डोहाळे

बुलडाणा, दि. 30 - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत होण्यापूर्वीच ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकीचे  पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. तालुक्याचे मध्यवर्ती राजकीय के्ंरदबिंदू असलेल्या मेरा बु. येथून काँग्रेसचे अशोकराव पडघान यांनी मागण्या वेळी विजय  मिळविला होता.
मेरा बु. जिल्हा परिषद सर्कल ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षीत झाले असून अनेक पक्षाच्या उमेदवारांनी उभे राहण्यासाठी राजकीय दिग्गज उमेदवार आपली  कंबर कसत असून इच्छूकांनी मतदार संघातील गावा गावांना भेटी देण्यास सुरूवात केल्याने मेरा बु. जि.प. सर्कलमध्ये राजकीय ारे वाहण्यास सुरूवात झाल्याचे  चित्र दिसत आहे.
मेरा बु.सर्कलमध्ये कोलारा अंबाशी, मेरा, अंत्री खेडेकर अशी बाहूबली गावे आहेत. तालुक्याच्या राजकारणाला सामाजिक वळण देण्यार्‍या गावांपैकी एक गाव  असल्याने मतदार संघातील सर्वांचे लक्ष या मतदार संघाकडे लागून आहे. या सर्कल मधील गावामधून जि.प.अध्यक्ष दोन दोन आमदार जि.प.उपाध्यक्ष,  जि.प.सभापती व पं.स.सभापती अशा पदावर काम करणारे नेते घडलेले आहेत. सौ.रेखाताई खेडेकर, विनायकराव पडघान, डॉ.शशिकांत खेडेकर, विद्यमान  जि.प.उपाध्यक्ष पांडूरंग खेडेकर आदि नेत्यांचे गावे या मतदार संघात आहेत. होणार्‍या जि.प.निवडणूकीसाठी ओबीसी महिला राखिव झाल्याने या मतदार संघासाठी  रोहीत खेडेकर, मदनराव म्हस्के, प्रताप कुटे, पांडूरंग खेडेकर, विनायक पडघान, विद्यमान जि.प. सदस्य अशोक पडघान गजानन वायाळ, सुधिर पडघान, राम  खेडेकर, अमोल पडघान, माजी सरपंच राजु पाटील, सुनिल खेडेकर, दत्तू पाटील, बाळू पाटील, आदि उमेदवार इच्छूक असून आपआपल्या पक्षाकडे उमेदवारी  मागण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. चिखली तालुक्यातील महत्वाचे असणारे मेरा बु.जि.प.सर्कल यावेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी निघाल्याने सर्वच पक्षाचे  पदाधिकारी आनंदीत झाले असून अनेकांना येथून निवडणूक लढविण्याचे डोहाळे लागले आहे. यासोबतच गावागावात फिरूनआतापासूनच कार्यकर्ते जमा करण्यात  गुंतले आहे. मात्र येणारा काळच सांगेल कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देणार व मतदार कोणाला निवडणार.
मेरा बु.चिखली तालुक्यात असली तरी सिंदखेड राजा मतदार संघात असल्यामुळे चिखली आणि सिंदखेड राजा मतदार संघातील गावामिळून तयार झालेल्या या  मतदार संघावर आपला उमेदवार विजयी होण्यासाठी आ.राहूल बोंद्रे, डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.डॉ.शशिकांत खेडेकर या मोठया नेत्यांना मोठा व यांची प्रतिष्ठा पणाला  लागणार आहे. प्रामुख्याने शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी व यंदा प्रथमच भारीप बहूजन पक्ष सुध्दा यावेळी पक्षाला उमेदवार देतांना विचार करणार आहे. यांसह इतर  पक्षही रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगत आहे.