Breaking News

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्राला कर्जाच्या दरीत ढकलेल : राणे

सिंधुदुर्ग, दि. 08 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून जन्माला आलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्राला कर्जाच्या दरीत ढकलणार आहे, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे. बुलेट ट्रेनचं कर्ज जपानकडून घेतलं जात आहे. जपानने कर्जाची परतफेड त्यांचे चलन येनमध्ये करण्याची अट घातली आहे. 50 वर्षांनंतर कर्जाची परत फेड करताना येनची रुपायाच्या तुलनेत फार वाढलेली असेल. कदाचित आपण परतफेड करु शकनार नाही., असे नारायण राणे म्हणाले.
जपानची दुसरी अट बुलेट ट्रेनचे काम जपानी कंपनीलाच द्यावे, ही आहे. जपानी कंपनी हे काम भारतीय कंपन्यांकडून कमी भावात करुन घेणार आणि त्याचे जास्त पैसे लावून पैसे कमवणार., असा आरोपही राणेंनी केला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, या बुलेट ट्रेनचा खर्च जवळपास 98 हजार कोटींच्या घरात आहे. पण मोदींचं हे सोनेरी स्वप्न राज्याला आर्थिक पारतंत्र्यात टाकेल, अशी भीती नारायण राणे यांनी व्यक्त केली.