Breaking News

नोटाबंदीला दोन महिने पूर्ण

नवी दिल्ली, दि. 08 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. दोन महिन्यानंतरही अनेक ठिकाणी नोटांचा तुटवडा जाणवत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार हा चलनकल्लोळ 16 मार्चपर्यंत संपू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर 15 लाख 44 हजार कोटी रुपयांच्या 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यानंतर 9 नोव्हेंबरपासूनच बाजारात चलनकल्लोळ निर्माण झाला. देशातील चारही प्रिंटिंग प्रेसमध्ये नोटांची छपाई युद्धपातळीवर चालू आहे. मात्र अद्यापही नोटांचा तुटवडा काहीशा प्रमाणात जाणवत आहे.