महाबळेश्वरात पारा खालावला, वेण्णा लेक भागात 0 अंश तापमान
सातारा, दि. 08 - महाराष्ट्राचं नंदनवन अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरात पारा कमालीचा उतरला आहे. महाबळेश्वरच्या सुप्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वेण्णा लेक परिसरात झाडांवरील दवबिंदू गोठले आहेत, तर परिसराला बर्फाच्छादित रुप आलं आहे. तापमान खालावल्यामुळे पर्यटक चांगलेच गारठले आहेत, मात्र त्यातही पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
थंडीच्या दिवसात विकेंडला बाहेरगावी जाण्याकडे शहरी भागातील लोकांचा कल असतो. अलिबाग, दापोली, माथेरान, महाबळेश्वर यासारख्या पिकनिक स्पॉटकडे पर्यटक आकर्षित होतात. त्यातच वेण्णा लेक परिसरात शून्य अंश तापमानाची नोंद झाल्याने पर्यटकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.