Breaking News

तंत्र अभियांत्रिकीच्या स्टुडन्ट असोसिएशनतर्फे मतिमंद मुलांच्या शाळेला अर्थिक मदत

कराड, दि. 30 (प्रतिनिधी) : येथील डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकीमध्ये देशाचा 68 वा प्रजासत्ताक दिन साजरा  करण्यात आला. संस्थापक-अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. जालिंदर पाटील, उपप्राचार्य प्रा. हणमंत  कुंभार व प्रा. अयुब कच्छी उपस्थित होते. महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ध्वजास सलामी दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त  महाविद्यालयाच्या तंत्र अभियांत्रिकीच्या स्टुडन्ट असोसिएशनतर्फे जुळेवाडी ता. कराड येथील मतिमंद मुलांची निवासी शाळेस अर्थसहाय्य करण्यात आले. प्राचार्य  डॉ. जालींदर पाटील यांच्या हस्ते अर्थसहाय्याचा धनादेश श्री बालाजी अपंग पुनर्वसन व शिक्षण प्रसारक मंडळ इस्लमपूरचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांच्याकडे सुपूर्द  करण्याात आला. यावेळी तंत्र अभियांत्रिकीचे विभाग प्रमूख डॉ. राजू पांचाळ, प्रा. गणेश जाधव, जनसंपर्क अधिकारी अबुबकर सुतार व स्टुडंन्ट असोसिएशनचे  पदाधिकारी सुशांत खोत, अशिष थोरात, ऋुतूजा चोरगे, ऋषिकेश शेटे, संग्राम पाटील आणि श्रध्दा माळवदे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष संजय पवार, सचिव राजाराम  माने, मुख्याध्यापिका सौ. विद्या पवार, शिक्षक विजय पवार व संभाजी यजगर शिक्षकेत्तर कर्मचारी बंडू माळी, संतोष गोळ्ळी व सौ. पौर्णिमा कांबळे पस्थित होते.  यावेळी विद्यार्थ्यांना जिलेबी व चॉकलेटसचे वाटप करण्यात आले. प्राचार्य डॉ. जालींदर पाटील यांनी विद्यार्थ्यांंना शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष संजय पवार यांनी  आभार मानले.