Breaking News

6 ते 11 फेब्रुवारीदरम्यान स्व. भाई गुजर चषक

कराड, दि. 30 (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य सेनानी स्व. गंगारामजी केशवराव तथा भाई गुजर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इंद्रजीत गुजर मित्र परिवारातर्फे डॉ. अशोक गुजर  टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग बनवडी, ता. कराड येथे महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर सोमवार, दि. 6 ते शनिवार, दि.  11 फेब्रुवारीदरम्यान टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघासाठी प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक 1,00,104 रुपये व चषक  सर्व शिक्षक कर्मचारी, डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ.  दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, बनवडी-कराड यांचेकडून, व्दितीय क्रमांकाचे रोख पारितोषिक 50,104 रुपये व चषक, शंकरराव खापे(बापू) माजी  सरपंच व विद्यमान मार्गदर्शक सदस्य बनवडी यांच्या विद्यमाने, तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक 25,104 रुपये व चषक, राहूल पाटील व राजेंद्र पाटील  (पार्लेकर), माजी सरपंच व विद्यमान सदस्य पार्ले यांचे संयुक्त विद्यमाने आणि चतुर्थ क्रमांकाचे रोख पारितोषिक 10,104 रुपये देण्यात येणार आहे.
तसेच स्पर्धेतील मॅन ऑफ दि सिरीज, बेस्ट बॅटसमन, अंतिम सामना मॅन ऑफ दि मॅच व बेस्ट बॉलर करीता प्रत्येकी रोख पारितोषिक 5000 रुपये तसेच, स्पर्धेत  सहभागी प्रत्येक संघास स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये दि. 2 फेब्रुवारी 2017 पर्यंत प्रवेश घेणे आवश्यक असून, प्रवेश फी 3,500/ आहे. अशी  माहिती अभिजीत मोडिगीरी यांनी दिली आहे.