Breaking News

प्रथमोपचारासाठी आणलेली औषधी तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहात

औरंगाबाद, दि. 13 - प्रथमोपचारासाठी आणलेली औषधी गंगापूर तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहात आढळल्यानंतर तहसील प्रशासनाने त्या  स्वच्छतागृहालाच काल कुलूप ठोकले. राज्यसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान प्रथमोपचारासाठी वापरण्यात येणारी औषधी आरोग्य विभागाने आणली होती.  परंतु ही औषधी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी परत न नेल्यामुळे तहसील कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्राच्या बाजूच्या रूममध्ये तीन वर्षांपासून पडून होती. या  रूमचे काम चालू झाल्यामुळे सर्व औषधी वापरात नसलेल्या स्वच्छतागृहात टाकण्यात आली होती. या औषधांची तहसील कार्यालयात कुठेही नोंद नसल्यामुळे  याकडे कोणत्याही कर्मचार्यांचे लक्ष नसल्याने ही औषधी पडून राहिली. सध्या स्वच्छतागृहाला कुलूप लावण्यात आले आहे. औषध निरीक्षक प्र. दी. हारक यांनी या  औषधांची तपासणी केली सदर औषधी कालबाह्या झाल्याने आता वाया गेली आहे.