Breaking News

संस्कार भारतीच्या वतीने संक्रांती निमीत्त तुळशीच्या रोपांचे वाण..

बुलडाणा, दि. 15 - 14 जानेवारी मकर संक्रांत या दिवशी सुर्य हा मकर राशीत प्रवेश करतो.दिवस हा तीळा तीळाने मोठा होण्यास सुरुवात होतो. सर्व भारतीय  सण  आणि परंपरा ह्या बळीराज्या पिकांवर आधारीत आहे. संक्रातीच्या वाणात हिवाळ्यात येणा-या बोर ,पेरु, वाटाणा, हरभरा, ऊस, बिबा यासारख्या वस्तुंचा  वाणात समावेश असतो. शेतकरी शेतात पिक आलकि प्रथम ते वाण दुस-याला  नैवेद्य म्हणुन देतो. मकरसंक्रांतीला स्त्रीया एकमेकींना वरील वस्तुंचे वाण  सुगड्यात घालुन देण्याची परंपरा आहे.कालानुरुप हळुहळु या परंपरा व सणांमधे आता बदल करायला हवे या उद्देशाने बुलडाण्याच्या संस्कार भारतीच्या शाखेच्या  अध्यक्षा अंजली परांजपे यांनी पर्यावरण पुरक उपक्रमाची जोड देवुन संक्रांतीनिमीत्त वाणात तुळशीच्या रोपांचे वाटप केले.व सुवासिंनी देखिल त्या रोपाचे रोपण  करुन जतन करण्याचा वसा घेतला. याकार्यक्रमाची सुरुवात सस्कांर भारतीच्या बुलडाणा शाखेच्या अध्यक्षा अंजली परांजपे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून  करण्यात आली.यानंतर सुवासिनींनी एकमेकींना तिळगुळाचे व तुळशीच्या रोपांचे वाटप केले.थंडीच्या दिवसात तिळ व गुळाचे पदार्थाचे सेवन का करतात याचे  महत्व सौ माया महाजन यानिमीत्ताने व्यक्त केले.
यानंतर सुवासिनींची उखाण्याची मैफल रंगली व एकापेक्षा एक सुंदर पारंपारिक व आधुनिक ढंगाचे उखाणे सुवासिनींनी घेतले. या कार्यक्रमासाठी माया  महाजन, अरुणा महाजन, गिता नागपुरे, सविता परांजपे, शोभा मिटकरी, शिला पाटील, माया सातव, संगीता भालेराव, वैशाली कुळकर्णी, मिनाक्षी सातव  यांनी  पुढाकार घेतला होता.