Breaking News

संगीत ही कोणाची मक्तेदारी नाही ः वायकर

अहमदनगर, दि. 04 - पूर्वीच्या काळात मोठ्या प्रमाणावर संगीत स्पर्धा व्हायच्या पण मधल्या काळात त्या बंद झाल्या. या स्पर्धानिमित्ताने नवोदित गायकांना पुन्हा  नवे व्यासपीठ मिळाले. नगरमध्ये आजपर्यंत अशी स्पर्धा कधीच झाली नाही. संगीत ही कुणाची मक्तेदारी नाही. पूर्वी ग्रामीण भागातील किंवा बाहेरच्या आलेल्या  कलाकाराला किंवा श्रोत्मांना स्पर्धांमध्ये नीट सामावून घेतलं जातं नव्हतं. त्यामुळे अशा स्पर्धा कुणासाठी होतात, ठराविक लोकांसाठीच होतात का असा प्रश्‍न  पडायचा. पण या स्पर्धेत आज सर्व प्रकारच्या स्पर्धकांना संधी मिळाली, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक बाळासाहेब वायकर मांनी केले.
अनुष्का मोशन पिक्चर अँड एन्टरटेनमेंट व सहज फाउंडेशनच्या वतीने माऊली सभागृहात आयोजित अहमदनगर स्वरसंग्राम स्वरांची रणभूमी या जिल्हास्तरीय  सुगम गीतगायन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर सुरेखा कदम, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, प्रसिद्ध सिनेनाट्य  अभिनेते मोहिनीराज गटणे,  पुण्याच्या सुवर्णा राठोड, अध्यक्ष कडुभाऊ काळे उपस्थित होते.