Breaking News

चिखली - कोरेगांवात विविध विकास कामांचा आ.जगतापांच्या हस्ते शुभारंभ

अहमदनगर, दि. 04 - श्रीगोंदा तालुक्यातील चिखली व कोरेगाव या गावांमध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन व भुमीपुजन आमदार राहुलदादा जगताप यांचे हस्ते  झाले. यामध्ये चिखली येथील दलितवस्ती सुधारणासाठी 6.00 लाख रुपये, चिखली ते कोरेगाव या 2 कि.मी. रस्त्यासाठी 30 लाख रुपये तसेच ग्रामपंचायत  कॉम्प्लेक्ससाठी 2 लाख 60 हजार असे एकूण 38 लाख 60 हजार निधीमधून झालेल्या विकास कामांचे उद्घाटन झाले. चिखली ते कोरेगाव रस्त्याचा प्रश्‍न हा  अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या रस्त्याचे काम होणे आवश्यक होते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी येथील प्रयत्नशील होते. त्यांच्या अडचणी लक्षात घेवून या  रस्त्याचे कामासाठी व इतर कामासाठी निधी प्राधान्याने निधि मंजुर करुन कामे केले असल्याचे आमदार राहुल जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले. यामुळे  येथील शालेय विद्यार्थी व शेतकर्‍यांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, हेमंतसर नलगे, अशोकराव कार्ले, रामदास झेंडेसर, भरत झेंडे, चेअरमन बापु गाडेकर, बबन नाना झेंडे,  शिवराम लंके, संभाजी कदम, गोरख बापु झेंडे, पांडूरंग झेंडे, नितीनआण्णा डुबल, व चिखली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कोरेगाव येथील कोरेगाव-देऊळगाव 1.5 कि.मी. रस्त्यासाठी  50 लाख व कोरेगाव - गुंडेगाव या 1.5 कि.मी. रस्त्यासाठी 50 लाख असे एकूण 1 कोटीचे  कामाचे भुमीपुजन आमदार राहुलदादा जगताप पाटील यांच्या हस्ते झाले.या उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, हेमंतसर नलगे, रामदास  झेंडेसर, सरपंच कैलास इंगवले, बाळासाहेब मोहारे, दादा साबळे, शरद साबळे, फत्तुभाई सय्यद, इश्‍वर मोहारे, आनंदा भोपते, जालिंदर इंगवले, गोवर्धन इधाटे,  अविनाश कवडे व कोरेगाव  येथील ग्रामस्थ मोठ्या  संख्येने उपस्थित होते.