Breaking News

जकात चुकविल्याने पावणेतीन लाखाचा दंड

सांगली, दि. 15 - सांगली-मिरज-कुपवाड  महापालिकेची जकात चुकवून शहरात माल आणल्याप्रकरणी तिघांना प्राथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील  यांनी सुमारे 2 लाख 74 हजार 550 रुपयांच्या दंड तसेच दिलेल्या मुदतीत दंड न भरल्यास 30 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पालिवाल अँड सन्स,  मोहनलाल डी. जोशी व जमनालाल पालिवाल (रा. मुंबई) अशी दंड व शिक्षा ठोठाविण्यात आलेल्यांची नावे आहेत. महापालीकेच्या वतीने अ‍ॅड. रियाज एस.  मुजावर यांनी युुक्तीवाद केला. 
खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, मिरज एम.आय.डी.सी मध्ये पालिवाल यांची दुग्ध व्यावसाय करणारी पालिवाल अँड सन्स ही फर्म आहे. त्यांनी महापरालिकेच्या हद्दीत  जकात चुकवून माल आणला होता. तपासणी वेळी महापालिकेच्या जकात विभागाच्या अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पालिवाल अँड सन्स,  फर्मचे व्यवस्थापक मोहनलाल डी. जोशी तसेच जमनालाल पालिवाल यांच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात मुंबई प्रांतिक महाअधिनियम  1949 च्या कलम 398 प्रमाणे फौजदारी खटला दाखल केला होता.
याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांच्या समोर सुनावणी झाली. त्यांनी दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे ऐकूण घेतले. साक्षी व पुराव्यावरुन  आरोपींनी मनपाचा जकात चुकवून माल हद्दीत आणल्याप्रकरणी त्यांना दोषी धरण्यात आले. तिघांनाही 2 लाख 74 हजार 550 रुपयांचा दंड करण्यात आला  असून न्यायालयाने दिलेल्या मुदतीत दंड न भरल्यास 30 दिवसांच्या कारावासाची शिक्षाही सुनाविण्यात आली आहे. तसेच दंडाची रक्कम महापालीकेस नुकसान  भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.