Breaking News

वरिष्ठ नेत्यांकडुन दुखावलेले प्रामाणीक नेते डॉ.राजपुत यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

बुलडाणा, दि 17 - स्थानिक शिवसेनेचे नेते डॉ.प्रतापसिंह राजपुत हे आपल्या प्रामानिक शिवसैनिकासह येत्या 20 जानेवारी रोज शुक्रवारला राजाटावर येथे  भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जिल्ह्यचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर जिल्हाध्यक्ष ध्रुपतराव सावळे आमदार डॉ.संजय कुटे आ.चैनसुख संचेती यांचे प्रमुख  उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत.  दोन वेळा विधानसभा मतदार संघात दिग्गजांच्या लढतीत त्यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली आहेत. पराभुत झाले तरी  डॉ.राजपुत ह्यांनी सामाजिक कार्य कधी सोडले नाही राजपुत समाजाचा भरभक्कम आधार असणारे व इतर बहुजन समाजात डॉ.राजपुत हे लोकप्रिय आहेत  त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश हा धक्कादायक आहे व ह्या मुळे शिवसेनेत अखेरची घरघरच लागली असे समजावे लागेल.
डॉ.राजपुत ह्यांच्या शिवसेना सोडल्याने राजकीय गणित बदलणार आहे. सत्तेत असलेल्या भाजपाला डॉ.राजपुत ह्यांचा प्रवेश फारच फायदेशीर ठरणार  आहे. शिवसेनेमध्ये असलेली गटबाजी व चेलेचपटी यामुळे ह्या प्रामाणिक नेत्याला शिवसेनेत काय कठीण झाले होते. त्यामुळे खुसमस्कर्‍यांना कंटाळुन डॉ.राजपुत  यांनी शिवसेनेला अखेरचा जयमहाराष्ट्र ठोकला.