पिंपळगांव जोगाचे आवर्तन सुरु ः शिरोळे
पारनेर, दि. 03 - पिंपळगांव जोगा धरणातील पाण्याचे रब्बी हंगामातील शेतीसाठी पहिले आवर्तन आज सोमवार दि. 26/12/2016 रोजी सकाळी सुरु झाल्याची माहिती पिंपळगांव जोगा कालवा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे यांनी दिली.
यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकर्यांनी उत्साहाने मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केलेली आहे परंतु सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्या पार्श्वभुमीवर डॉ. शिरोळे यांनी पिंपळगांव जोगाचे आवर्तन त्वरीत सोडण्याची मागणी कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर व तहसिदार भारती सागरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा रब्बी हंगामातील सर्व पिकांना ज्वारी, हरबरा, कांदा, गहू, फळबागा व भाजीपाला यांना लाभ होईल.
सध्या 120 क्युसेसने पाणी सोडण्यात आलेले आहे. हे आवर्तन टेल टू हेड आहे. पारनेरसाठी एकवीस दिवसांचे आवर्तन आहे. भविष्यात हक्काचे पाणी मिळण्यासाठी लाभधारक शेतकर्यांनी जास्तीत जास्त मागणी अर्ज भरावेत असे आवाहन डॉ. शिरोळे यांनी केले आहे.