Breaking News

नव्या डिझाईनच्या पॅन कार्डचे वितरण सुरु

मुंबई, दि. 14 -  सरकारने नवीन रुपातील पॅन कार्डचे वितरण करण्यास सुरुवात केली आहे . या पॅन कार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विशेष  उपाययोजना करण्यात आली आहे.  पॅन कार्डवरील संबंधित व्यक्तीची माहिती हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये नमूद करण्यात आला आहे , अशी माहिती आयकर  विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे.
एनएसडीएल आणि युटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी ण्ड सर्व्हिसेस  ने  नवे पॅन कार्ड तयार केली आहेत. एक जानेवारीपासून या पॅनकार्डचे वितरण करण्यास  सुरुवात झाली आहे. हे नवे पॅनकार्ड सध्या केवळ नवीन अर्जदारांसाठी देण्यात येत आहे.