Breaking News

मकरसंक्रांतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली, दि. 14 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मकरसंक्रांत आणि लोहरीनिमित्त देशवासियांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या. देशातील  जनतेच्या जीवनात आनंद आणि समृद्धीची भरभराट येऊ द्या  असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे .  देशभरात मोठ्या उत्साहाने आज मकरसंक्रांत साजरा  केला जात आहे.
मकर संक्रांत हा सण विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. मकर संक्रांत तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण पंजाबमध्ये माघी तर  आसाममध्ये बीहू नावाने साजरा केला जातो. ज्या नावाने हा सण ओळखला जातो.