Breaking News

जि.प. निवडणुकांच्या प्रचाराला सर्व मंत्र्यांना जावेच लागेल - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 14 - नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी दौरे न केले नसल्याने अपेक्षित यश मिळू शकले नाही. याबाबत पुन्हा एकदा  नाराजी व्यक्त करत यंदा जिल्हा परिषदांच्या प्रचाराला सर्व मंत्र्यांना जावेच लागेल. ग्रामीण भागांत सभा घ्याव्याच लागतील. तळागाळात जाऊन संघटना मजबूत  करा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले. पालिका व जि.प. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मातोश्रीवर झालेल्या मंत्री, आमदार व प्रमुख  नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत रामदास कदम, सुभाष देसाई, दीपक केसरकर, विजय शिवतारे, खा. अनिल देसाई आदी नेते उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या  निवडणुकीत सत्तेत असूनही पक्षाने सत्तेचा वापर केला नाही, अशा शब्दांत काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.