Breaking News

नगर-दौंड रस्त्याची दुरावस्था ; अधिकार्‍यांचे दूर्लक्ष

अहमदनगर, दि. 14 - श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगरदौड रोडवर मोठमोठेखड्डे पडल्यामुळे शासनाने निधी देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम  हाती घेतले आहे असे आसताना कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असुन काम करताना कामासाठी आनलेली खडी एकसारखी नाही तिच खडी ररस्त्यावर टाकताना  फक्त रस्ता साफ करून त्यावर डांबर न टाकता खडी टाकली जाते आणि त्यावर रोलर फिरवून डांबर टाकून लहान कच टाकून खडडे बुजविले जातात. पण हेच  काम दुसर्‍या दिवशी पुन्हा जैसे थे त्यामुळे कामाच्या दर्जाकडे कोणाचेही लक्ष् नसल्यामुळे शासनाचा कोटीचा निधी वायाजात आहे. पण संबधीत आधिकारी ठेकेदार  फक्त पाहण्याची भूमिका घेतात नगर-दौड रोडवर दररोज हजारो वाहने वाहतात त्यांचे वजन दहा टनापासुन ते साठ टनापर्यत आसते. आणि डांबर न टाकता खडी  टाकून फक्त वरती डांबर टाकून रस्ता पक्का होत नाही. त्यामुळे चाललेले काम अतिशय संथ गतिने आणि निकृष्ट आहे. दर्जाचे चालु असुन ऑईल मिक्स डांबर  वापरून बोगस बीले काढण्याचा प्रताप ठेकेदार करित आहे. गावातील एक कि.मी. रस्ता दुरूस्तीसाठी सुमारे सत्तर लाख रूपयेचा निधी आला असुन तो योग्य  पद्धतीने वापरला जात नाही त्यामुळे चालले काम त्वरीत बंद करून ठेकेदाराने मागिल काम पुन्हा करावे अन्यथा त्यांचे बील काढू नये चांगले काम केले तरच बील  काढावे खराब रस्त्यामुळे वाहन धारक वैतागले असुन याकडे कोणीही लक्ष् देत नाही हिच पारिस्थिती इतर गावात आहे त्यामुळे वरिष्टानी यांची गंभीर दखल घेऊन  कार्यवाही करावी अशी मागणी गावातील मदन भोसले. बाळासाहेब धुमाळ. गणेश चव्हाण. राहुल नलवडे. किरण नाळे.यांनी केली आहे.