Breaking News

अरणगावात परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा नारळ

अहमदनगर, दि. 14 - नगर तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या अरणगाव येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणुक सुरू आहे. येत्या 21 जानेवारी  रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने गावात दोन पॅनल निवडणुकीत आमने सामने भीडले आहेत. शुक्रवारी सकाळी परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा नारळ  युवा नेते मोहन गहिले, सरंपच सुजित कोके व गंगाधर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाढविला आहे. प्रचार शुभारंभास मोठी गर्दी असल्याने आजपासून परिवर्तन  पॅनलने प्रचारात आघाडी घेतल्याचे सध्या तरी दिसत आहे.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकी जाहीर झाल्याने या सोसायटीच्या निवडणुकीलाही राजकीय दृष्ट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील  दिग्गज राजकीय नेत्यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. एकून 13 जागांसाठी ही निवडणुक होत असून एकून 600 मतदान आहे. शेतकरी विकास पॅनलचे  नेतृत्व माजी सरपंच ज्ञानदेव शेळके के करीत असून यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक होत आहे. दोन्ही पॅनलमध्ये सक्षम, जाणकार व दांडगा जनसंपर्क असणारे  उमेदवार असल्याने निवडणुक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी 20 जानेवारीपर्यंत मुदत असल्याने प्रचाराचा चांगला धुराळा उडाला आहे. या  निवडणकीत एक विशेष म्हणजे, परिवर्तन पॅनलमध्ये तरूणांना निवडणुकीत संधी देण्यात आल्याने तरूणांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. परिर्वतन पॅनलचा  नारळ वाढविण्यात आला. यावेळी मोहन नाट, लहू अजबे, शिवाजी पंजरकर, अप्पा शिंदे, हरिभाऊ शिंदे, बबन शिंदे आदींसह उपस्थित होते.