रिषभ पंत टीम इंडियात नवीन चेहरा
मुंबई, दि. 07 - रणजी सामन्यात वादळी खेळी करुन, टीम इंडियाच्या दरवाजावर उभ्या असलेल्या दिल्लीच्या तरण्याबांड रिषभ पंतने अखेर दिमाखात एण्ट्री केली आहे. 19 वर्षीय विकेटकीपर फलंदजा रिषभ पंतने भारताच्या टी ट्वेण्टी संघात स्थान मिळवलं आहे. गेल्यावर्षी दिल्लीकडून खेळणार्या रिषभने रणजी चषकात 48 चेंडूत धडाकेबाज शतक ठोकून, रणजी स्पर्धेतील सर्व रेकॉर्ड मोडले होते.
पंतचं यंदाच्या 2016/17 हंगामातील हे चौथं शतक होतं. यापूर्वी त्याने एक त्रिशतकही ठोकलं होतं. महत्त्वाचं म्हणजे अवघ्या सहाव्या खेळीतील हे त्याचं चौथं शतक होतं. यापूर्वी त्याने 146, 308, 24, 60 आणि117 धावांच्या खेळी साकारल्या होत्या. तसंच रिषभने 19 वर्षांखालील विश्वचषकात 24 चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह 78 धावांची खेळी साकारली होती. त्याची ही खेळी एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ठरली होती.
दरम्यान, रिषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनच पदार्पण करणार होता. दुखापतग्रस्त रिद्धीमान साहाच्याजागी त्याची निवड होता-होता राहिली होती. मात्र जबरदस्त खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेणार्या रिषभने अखेर टीम इंडियात प्रवेश मिळवला आहे.