नवीन वर्ष युवीसाठी लकी, वनडे, टी-20 संघात पुनरागमन
मुंबई, दि. 07 - इंग्लंडविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यासाठी आज भारतीय संघाची निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे वनडे आणि टी20 संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आलं आहे. दरम्यान, भारतीय संघात टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंहची निवड करण्यात आली आहे.
वनडे आणि टी-20च्या दोन्ही संघामध्ये युवराज सिंहला स्थान देण्यात आलं आहे. याआधी जवळजवळ 3 वर्षापूर्वी युवराज वनडे सामन्यात खेळला होता. तर युवराज टी-20 संघातूनही जवळजवळ वर्षभर बाहेरच होता.
मात्र, मागील काही महिन्यात स्थानिक क्रिकेटमध्ये युवराजनं चांगली कामगिरी केली होती. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यानं शतकं झळकावून निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे आता या मिळालेल्या संधीचं युवराज सोनं करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे युवराजसोबत शिखर धवनचंही संघात पुनरागमन झालं आहे.