पृथ्वी शॉचं शतक, मुंबई फायनलमध्ये
मुंबई, दि. 06 - मुंबईच्या पृथ्वी शॉनं तामिळनाडूविरुद्ध रणजी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला असून, त्याच्या या कामगिरीनं मुंबईला रणजी करंडकाच्या फायनलचं तिकीटही मिळवून दिलं आहे. त्यामुळं यंदाच्या मोसमात मुंबई आणि गुजरात संघांमध्ये रणजी करंडकाचा अंतिम सामना पाहायला मिळेल.
राजकोटच्या उपांत्य सामन्यात मुंबईनं तामिळनाडूवर सहा विकेट्सनी मात केली. या सामन्यात तामिळनाडूनं मुंबईला विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं होतं. पृथ्वी शॉनं वैयक्तिक शतक झळकावलंच, पण पहिल्या तीन विकेट्ससाठी तीन भागिदार्या रचून त्यानं मुंबईला विजयपथावर नेलं. त्यानं प्रफुल्ल वाघेलाच्या साथीनं सलामीला 90 धावांची, श्रेयस अय्यरच्या साथीनं दुसर्या विकेटसाठी 91 धावांची आणि मग सूर्यकुमार यादवच्या साथीनं तिसर्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली. पृथ्वी शॉनं 174 चेंडूंत 13 चौकार आणि एका षटकारासह 120 धावांची खेळी उभारली.