Breaking News

घुमा चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा तरुणाईशी मंगळवारी खुला संवाद

अहमदनगर, दि. 30 - पेमराज सारडा महाविदयालयात यंदा स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांच्या पहिली पसंती ठरलेलासुप्रसिद्ध  घुमा या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे आणि  घुमा चित्रपटाची संपूर्ण टीम अहमदनगरमध्ये येणार आहे. येत्या मंगळवारी, 31 जानेवारी 2017 रोजी  सकाळी 9 ते 12 या वेळेत पेमराज सारडा महाविदयालयात विद्यार्थी आणि निमंत्रितांशी खुला संवाद घुमाची टीम करणार आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतल्या  नगर जिल्ह्यातील युवकांनी अनेक आव्हानांना तोंड देत घुमा हा चित्रपट कसा पूर्ण केला याची प्रेरक कथा या निमित्ताने तरुणाईला समजणार आहे. प्रा. निनाद  बेडेकर आणि डॉ. स्मिता घुसे या घूमाच्या टीमशी सवांद करणार आहे. दुपारी 4 वाजता महेश काळे यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार  आहे. मदन आढाव, अविनाश मकासरे, अजय थोरात, शरद जाधव, विक्रम शंकपाळे, मंगेश जोंधळे संतोष इंगळे, नवनाथ खराडे, प्रमोद कसबे, सारंग बारस्कर,  रावसाहेब काळे येणार असल्याची माहिती स्नेह संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. अमरजा रेखी यांनी दिली.