Breaking News

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार

नवी दिल्ली, दि. 04 - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. संसद अधिवेशनासंदर्भात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प प्रथमच एकत्रितपणे सादर केला जाणार आहे.