पंतप्रधान, बॉलिवूडकडून ओम पुरींना श्रद्धांजली
नवी दिल्ली, दि. 06 - ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ओम पुरी यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. अनेक बॉलिवूडकरांनी ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओम पुरींना आदरांजली वाहिली. ओम पुरींच्या सिनेमांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
ओम पुरींना मी गेल्या 43 वर्षांपासून ओळखतो, ते नेहमी माझ्यासाठी एक महान कलाकार आहेत आणि राहतील. शिवाय त्यांना संपूर्ण जगही एक महान कलाकार म्हणून पाहिल, असं अभिनेते अनुपम खेर म्हणाले. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही ओम पुरींना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली. सिनेसृष्टीने एक महान कलाकार गमावला, असं निर्माता करण जोहर म्हणाला.
ओम पुरींच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला, त्यांच्यासोबत ‘अर्धसत्य’ सिनेमासह अनेक सिनेमात काम केलं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात अभिनेत्री माधुरी दीक्षितने श्रद्धांजली वाहिली. ओम पुरींच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. ते माझ्यासोबत अनेक सिनेमात सहकलाकार म्हणून होते. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असं अक्षय कुमार म्हणाला.