Breaking News

ग्रामीण भागाला नव्या नोटांचा पुरवठा करा - रिझर्व्ह बँक

नवी दिल्ली, दि. 04 - नोटा रद्दच्या निर्णयानंतर शहरी भागासह ग्रामीण भागालाही चलनटंचाई सोसावी लागत आहे. याच पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागाला होणारा नव्या नोटांचा पुरवठा वाढवण्यात यावा, असे निर्देश रिझर्व्ह बँकने सर्व बँकांना दिले. ग्रामीण भागात 40 टक्के नव्या नोटा पाठवण्याचे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागात नोटांची मागणी जास्त आहे. मात्र या भागात त्या तुलनेत नोटा पोहोचत नाहीत, असे बँकेने म्हटले आहेत. ग्रामीण भागांची गरज ओळखून त्यांना नव्या नोटा पुरवल्या जाव्यात, असे बँकेकडून सांगण्यात आले. बँकांच्या करन्सी चेस्टना ग्रामीण भागात कमी मूल्यांच्या नोटा पुरवण्याच्या सूचनाही बँकेने दिल्या आहेत. ग्रामीण भागातील व्यवहार कमी किमतीचे असल्याने तिथे सुट्या पैशांचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. बँकांच्या करन्सी चेस्ट ने  ग्रामीण भागात पाचशे आणि त्याखालील मूल्यांच्या नोटा ग्रामीण भागात उपलब्ध करुन द्याव्या, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले.