Breaking News

रिझर्व्ह बँकेकडून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एक लाखांचा दंड

मुंबई, दि. 04 - बँक नियामक कायद्यानुसार नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
रिझर्व्ह बँकेने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर बँकेने रिझर्व्ह बँकेसमोर लेखी व तोंडी दोन्ही प्रकारे स्पष्टीकरण दिले. मुंबई बँकेची बाजू ऐकून घेतल्यावर रिझर्व्ह बँकेने हा दंड ठोठावला. बँक नियामक कायद्यातील कलम 47 (अ) आणि कलम 46 (4) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेच्या खातेधारकांच्या माहितीशी (केवायसी) संबंधित नियम, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक उपाययोजना व रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.