Breaking News

स्पाईटजेट करणार 205 विमानांची खरेदी !

नवी दिल्ली, दि. 14 -  ‘स्पाईटजेट’ ही विमान कंपनी बोईंगकडून 205 विमानांची खरेदी करणार आहे. हा भारतीय विमान क्षेत्रातील एक मोठा खरेदी  करार आहे.
या विमानांच्या खरेदीसाठी 1 लाख 50 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून कंपनीने 2005 मध्ये बोईंगकडून पहिली खरेदी केली. बोईंग कंपनी पहिल्यांदाच  भारतातील विमान कंपनीला इतक्या मोठ्या प्रमाणात विमानांची विक्री करणार आहे. किंगफिशरप्रमाणे स्पाईटजेटलाही नुकसान सहन करावे लागते, मात्र असे  असूनही आम्ही 205 विमाने खरेदी करणार आहोत, असे स्पाईटजेचे संचालक अजय सिंग यांनी सांगितले.