Breaking News

मराठवाड्यातील धरणांमध्ये 57 टक्के साठा

औरंगाबाद, दि. 17 - यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे जानेवारीच्या दुसर्या आठवड्यातही  मराठवाड्यातील धरणांत 4592 दलघमी (57 टक्के) साठा आहे. जानेवारीच्या दुस-या आठवाड्यात एवढा पाणीसाठा शिल्लक असण्याची ही पाच वर्षांतील पहिली  वेळ आहे. मराठवाड्यात या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे त्याचा फायदा शेतकर्यांना होत आहे. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याचे गेल्या  चार वर्षांतील चित्र  बदलल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणांत यावर्षी 58 टक्के साठा असून उपयुक्त पाणीसाठा 2957  दलघमी आहे. गेल्यावर्षी हा पाणीसाठा 568 दलघमी (11 टक्के) साठा होता, तर 2011 मध्ये 2424 दलघमी, 2012 मध्ये 696 दलघमी, 2013 मध्ये 2531  आणि 2014 मध्ये 1654 दलघमी पाणीसाठा होता. यावर्षी जायकवाडी धरणात 66 टक्के, येलदरी 26, सिद्धेश्‍वर 36, माजलगाव 80, मांजरा 86, उर्ध्व पैनगंगा  39,निम्न तेरणा 91, मानार 70, विष्णुपुरी 58, दुधना 89 आणि सिनाकोळेगाव प्रकल्पात 71 टक्के साठा शिल्लक आहे.