Breaking News

2020 पर्यंत कार्ड-एटीएम आणि पीओएसचा काहीही उपयोग नाही : कांत

नवी दिल्ली, दि. 09 - भारतात 2020 पर्यंत क्रेडिट, डेबिट कार्ड, एटीएम आणि पीओएस यांचा काहीही उपयोग राहणार नाही, असं निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे.
भारतात सध्या आर्थिक तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन वेगाने होत आहे. या दोन्ही क्षेत्रांच्या बदलामुळे येत्या काळात देशाचा मोठा विकास होईल. त्यामुळे येत्या अडीच वर्षात पर्यंत क्रेडिट, डेबिट कार्ड, एटीएम आणि पीओएस यांचा काहीही उपयोग नसेल, असा दावा अमिताभ कांत यांनी केला.
भारताचा एवढा विकास होईल की केवळ अंगठा लावून 30 सेंकदात कोणतंही पेमेंट करता येईल. सध्या डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे येत्या काळात अनेक नवीन बदल होतील, असं अमिताभ कांत म्हणाले. भारतात बायोमेट्रिक प्रणालीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे डिजिटल होण्यासाठी याचा चांगला फायदा होईल, असा विश्‍वासही अमिताभ कांत यांनी बोलून दाखवला.