14 वर्षांनंतर उत्तर प्रदेशातील विकासाचा वनवास संपणार : मोदी
लखनऊ, दि. 02 - आपल्या स्वार्थासाठी जनतेला दावणीला बांधणार्या पक्षांना धडा शिकवा, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. एरव्ही कधीही एकमत न होणारे पक्ष नोटाबंदी होताच सरकारविरोधात एकवटले आहेत, असं म्हणत मोदींनी समाजवादी पक्ष, बसपावर तिखट प्रहार केला. इतकंच नाही, तर या सभेतून मोदींनी काँग्रेसचाही समाचार घेतला.
उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये भाजपच्या परिवर्तन रॅलीला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. ही माझ्या आयुष्यातील भव्य रॅली असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. देशाचा विकास व्हायचा असेल, तर आधी उत्तरप्रदेशचा विकास झाला पाहिजे असं मत मोदींनी व्यक्त केलं. पण गेल्या 14 वर्षांपासून स्वार्थी राजकारणाच्या वनवासात असलेल्या उत्तर प्रदेशच्या जनतेला विकासाच्या वनवासातून मुक्त करण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले.