दहशतवादाविरोधात इस्लामी देशांची लष्करी आघाडी, प्रमुखपदी राहील शरीफ यांची नियुक्ती
इस्लामाबाद, दि. 08 - दहशतवादाविरोधात लढण्यासाठी इस्लामिक देशांनी लष्करी आघाडी तयार करण्याचे ठरविले असून या आघाडीच्या प्रमुखपदी पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा लढा सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली लढला जाणार असून यात 39 देशांचा समावेश असल्याची माहिती पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली.
दहशतवादाविरोधात काही दिवसांपूर्वी एक करार करण्यात आला होता. या कराराबाबत आसिफ यांना विचारले असता कोणती सविस्तर माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीचे मुख्यालय रियादमध्ये असणार आहे.
या प्रमुखपदी नियुक्ती करण्यासाठी सरकार आणि लष्कराच्या मुख्यालयाकडून परवानगी मिळविणे आवश्यक असल्याचेही संरक्षणमंत्री आसिफ यांनी सांगतिले.
परस्पर देशांमधील सुरक्षेसाठी सहकार्य करणे, प्रशिक्षण, हत्यारे आणि जवान यांच्याशी संबधीत काही तरतूदी करणे आणि वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी हे 39 देश एकत्र आले आहेत.