शारंगधर शेतकरी संघाचे गुर-ढोरासह आमरण उपोषण
बुलडाणा, दि. 23 - नविन ट्रान्सफार्मरसाठी शारंगहार शेतकरी स्वयं सहाय्यता गट तर्फे गेल्या चार वर्षापासुन मागणी सुरू आहे. आणि विद्युत वितरण कंपनीचे डिव्हिजनल ऑफिस खामगांव येथील मागील दोन वर्षापासुन मंजुरात मिळुनही अध्याप ट्रान्सफार्मर बसविण्यात आलेले नाही. उपविभागी कार्यालय मेहकर येथे बर्याच वेळ अर्ज करून व स्मरण पत्र देऊन सुध्दा काम सुरू केलेले नाही. अधिकार्यांना या बाबत विचारणा केली असता ते फक्त उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. मागील 3 ते 4 वर्षापासुन ही मागणी फौजापुर शिवारातील शारंग हा स्वयं सहाय्यता गट मेहकर चे सर्व संचालक व शेतकरी यांनी ह्या आमरण उपोषणास दि 20 डिसेंबर पासुन आपल्या गुराढोरांसह विजवितरण विभाग मेहकर कार्यालय समोर सुरूवात केली असुन होणार्या परिणामास आपण स्वतः व शासन जबाबदार राहील याची संबंधीत अधिकार्यांनी नोंद घ्यावी अशी आमरण उपोषण कर्ताची या निवेदनात मागणी केलेली आहे. यामध्ये गणेश म्हस्के, पिराजी आगरकर, कैलास शिंदे, लक्ष्मण शिंदे, कालु रेघीवाले, भगवान शिंदे, सलीम गवळी, नारायन शिंदे, रामशंकर म्हस्के, आदी शेतकरी आमरण उपोषणास बसलेले आहेत.