बेटी-बचाओ बेटी-पढाओ अभियान बनले लोकचळवळ..!
बुलडाणा, दि. 23 - देशात अनेक जिल्ह्यात मुलींची संख्या प्रति हजार मुलांमागे खूप कमी आहे. अशा अवस्थेत बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश होता. केंद्र शासनाने अशा जिल्ह्यांमध्ये प्रति हजार मुलांमागे मुलींची संख्या वाढावी, स्त्री लिंग गुणोत्तर प्रमाण सारखे रहावे यासाठी बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान सुरू केले. जिल्ह्याचा समावेश या अभियानात करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि मुलींची प्रति हजार मुलांमागे घसरलेली संख्या वाढविण्यासाठी प्रबोधनाचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविण्यात आले. लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनातून विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. परिणामी, बेटी बचाओ- बेटी पढाओ अभियान जिल्ह्यात लोकचळवळीच्या स्वरूपात पुढे आले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कृती समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात नियमित बैठक आयोजित करण्यात येतात. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत प्रबोधनात्मक उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रमांचे ग्रामस्तरावर आयोजन करण्यात येते. त्यासाठी जिल्हास्तरीय, तालुका स्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी व कर्मचार्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या ड. वर्षाताई देशपांडे यांचे उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम आरोग्य पोषण समिती सदस्यांची कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी सदस्य ग्रामपातळीवर निश्चितच प्रबोधन करीत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी बालीका जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे अन्य ग्रामस्थांमध्ये मुलीच्या जन्माविषयी आपसूकच प्रबोधन घडून येत आहे. त्याचप्रमाणे विविध जनजागरण कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्या स्वाक्षरीचे बेटी-बचाओ, बेटी-पढाओ अभियानाचा उद्देश आणि आवाहन करणारे पत्र गावांमध्ये जोडप्यांच्या घरी देण्यात येत आहे. त्यामुळे एक भावनिक आवाहन करण्याचे कार्य जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. तसेच अतिसंवदेनशील गावांमध्ये ग्रामस्तरीय बेटी बचाओ, बेटी पढाओ समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती महिलांमध्ये जनजागृती करीत आहे.
त्याचप्रमाणे पीसीपीएनडीटी कायद्याबाबत जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रधारकांची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत सोनोग्राफी केंद्र धारकांना सूचना देवून गर्भलिंग निदान न करण्याचे आवाहन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी सिंदखेड राजा तालुक्यात स्टिंग ऑपरेशन राबवून काही सोनोग्राफी केंद्रांना सील ठोकण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. एवढ्यावरच प्रशासन थांबले नाही, तर कुटूंब स्तर संवाद अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील 1 लक्ष 40 हजार 785 जननक्षम जोडप्यांपैकी 1 लक्ष 23 हजार 170 जोडप्यांना भेटी देण्यात आल्या व त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्याचप्रमाणे जनजागृतीसाठी घरावर, मोटार सायकल किंवा चार चाकी वाहनांवर बेटी बचाओ, बेटी पढाओ चा संदेश देणारे स्टीकर्स लावण्यात आले. चांगले काम करणार्या ग्रामपंचायतीचा तसेच मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढलेल्या गावांचा पालकमंत्री यांच हस्ते सत्कारही करण्यात येणार आहे. लोकांचा वाढता सहभाग बघता, हे अभियान जिल्ह्यात लोकचळवळ बनले आहे, एवढे मात्र निश्चित.