रस्त्यावरील त्रासदायक ठरणारी गिट्टी व मुरूम तात्काळ हटवा अन्यथ अधिकार्यांना घेराव!
बुलडाणा, दि. 23 - मेहकर डोणगांव रोडवर लाहोटी कॉम्प्लेक्स समोर टाकलेल्या गिट्टी व मुरूम तात्काळ हटविण्यात यावी अशी मागणी मेहकर भाजपाच्या मंदाकिनीताई कंकाळ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मेहकर डोणगांव सा.बां.विभागाच्या हद्दीतील मेहकर येथील लाहोटी कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रस्त्यावर श्री संत गजानन महाराज यांचे पालीखीच्या आगमनाप्रसंगी टाकलेल्या रोडवरील गिट्टी व मुरूम यामुळे आजूबाजूचे दुकानदार तसेच दवाखाने मेडिकल व ह्या रस्त्यावरुन तालुक्यातील सर्व नागरीकांची गेल्या 5 महिन्यांपासून धुळ, गिटटी तसेच मातीपासून सर्वच दुकानदार व नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या 30 फुटाच्या रस्त्यासाठी आपल्याकडे डांबर उपलब्ध नाही किंवा काय अडचण आहे याची माहीती द्यावी व आठ दिवश्रसाचे आत जर या रोडचे काम झाले नाही तर लोकशाही मार्गाने या रस्त्यावर सा.बा.विभागाच्या अधिकार्यांच्या गाड्या तसेच सा.बां.वि.गाड्या अन्य वाहने रोखून त्यांना घेराव घालण्यात येईल. तरी या त्रासाला आपण व आपले अधिकारी व कर्मचारी व विभाग जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे नमुद करण्यात आले आहे.
निवेदनावर मंदाकिनीताई कंकाळ, शैलेश देशमुख, सौ.अर्चना पांडे, निलेश नाहटा, नवलचंद जैन, बाळू जाधव, सुरेश छत्रे, दशरथ गोसावी यांच्यासह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.