विज्ञान प्रदर्शनी मध्ये दीनदयाल विद्यालयाचे सुयश
बुलडाणा, दि. 31 - विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सुप्त वैज्ञानिक कलागुणांना वाव देण्यासाठी नुकतेच तालुक्यातील मौलाना आझाद उर्दू हायस्कूल दे.मही येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दीनदयाल विद्यालयाने जिल्ला प्रदर्शनी मध्ये स्थान मिळवले आहे.
प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी शेतकर्र्यांच्या पिकाचे रक्षण करणारी तोफ,पावसाच्या पाण्याचा पुर्नवापर,स्मार्ट सिटी,सोलर वॉटर हिटर, अपघात नियंत्रण ,टाकाऊ वस्तू पासून बनविलेले फवारणी यंत्र अशा अनेक प्रतिकृती प्रदर्शनात ठेवणव्यात आल्या होत्या. या प्रदर्शनात प्राथमिक विभागात कृष्णा मनोहर दळवी व महेश अंबादास उगले,कु.सोनल देवानंद गिते, कु.पल्लवी छगन मिसाळ अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.त्यामध्ये निबंधस्पर्धेतून कु.स्वाती सुधाकर जायभाये(प्रथम),वक्तृत्व स्पर्धेतून तेजस श्रीकृष्ण दंदाले(प्रथम) पुरस्काराचे मानकरी ठरले,तसेच शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक बबन मुंढे यांनी सडलेल्या टोमॅटो पासून वीजनिर्मिती तयार करून प्रथम क्रमांक मिळवला.
संस्थेचे मा.अध्यक्ष,मा. सचिव याच्या प्रेरणेने,मा. मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळे व विज्ञान शिक्षक कु.जे. एस.गवले मॅडम,व्ही.ए.शिंगणे सर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन व परिश्रम घेतले.