Breaking News

परिचारीका महाविद्यालयात शपथविधी संपन्न


बुलडाणा, दि. 31 - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचारीका प्रशिक्षण केंद्राच्या ए एन एम कॉलेजच्या आक्टोंबर 2016 बॅचच्या विद्यार्थींनीच स्वागत समारंभ व  शपथविधी समारंभ परिचारिका महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ ए. व्ही सोनट्टके हे होते. तर  प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ जे आर मकानदार,डॉ व्ही एम कुटुंबे ,मेट्रन एम.जी.वर्माम महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्वला खेडकर,प्रमिला पिसे, डॉ विजया काकडे  मंचावर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ ए.व्ही .सोनट्टके यांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन आद्य परीचारीका फ्लॉरेन्स नाईटिंगेल, मा जिजाऊ, सावित्रीबाईफुले यांच्या  प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी केले.यानंतर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनीनीं मेट्रन वर्मा मॅडम व प्राचार्या उज्वला खेडकर यांचे कडुन रुग्णसेवेची ज्योत प्रज्वलीत  करुन घेतली व ती तेवत ठेवण्याचा निर्धार केला.यानंतर दिव्याच्या झगमगाटात व ईश्‍वराच्या साक्षीने नविन विद्यार्थीनींनी प्रामाणिकपणाने व्यवसाय व रुग्णांची  सेवाकरण्याची व त्यांच्या सुखदुखात आयुष्यभर सामावुन घेण्याची शपथ घेतली.इतनी शक्ती हमे देना दाता हे गीत विद्यार्थीनींनी याप्रसंगी गायले.
    शैक्षणिक विकासाबरोबर व्यक्तिमत्व विकासावर भर देवुन आपण निवडलेल्या क्षेत्राशी प्रामाणिक साहुन सेवा करण्याचा आनंद फार मोठा असतो असे मत  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ सोनट्टके यांनी यावेळी व्यकत केले.या कार्यक्रमात डॉ विजया काकडे लिखित परिचारीका  व निर्णय या दोन पुस्तकांचे प्रकाशन  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शपथ विधीच्या निमीत्तने मेट्रन वर्मा,प्राचार्या उज्वला खेडकर, श्रीमती पि जी मेहत्रे,  श्रीमती पी ए पवार, श्रीमती ए जे कुरसिंगे  यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मिना शेळके यांनी केले.दिपाली खोसरे व वैशाली सोनुने यांनी कार्य्क्र्माचे सुत्रसंचालन केले तर  स्वाती चिंचोले यांनी कार्यक्रमाची सांगता विद्यार्थीनींनी हम होंगे कामयाब या गिताने केली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या कर्माचा-यांनी व  विद्यार्थीनींनी पुढाकार घेतला होता.